भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत
1 min read

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत

Loading

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी – मंगलग्रह मंदिर सोहळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी व  सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष घालावे..

कारण शहराला जोडणारे धुळे चोपडा रस्ता, धरणगाव, पारोळा हे प्रमुख रस्ते हे त्या विभागाला येतात

कळकळीचे निवेदन देत पर्यावरण मित्र दिलीप सोनवणे यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगलग्रह मंदिर संस्थानात येत्या दोन दिवसांत देशभरातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत भव्य सोहळा आयोजित होत आहे. या पार्श्वभूमीवर दगडी दरवाजा ते बोरी नदी पूल, पैलाड, स्मशानभूमी, ताडेपुरा या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
“आज ना उद्या काम सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु अद्यापही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेनं हे काम प्राधान्याने करून तातडीने खड्डे बुजवावेत,” अशी मागणी दिलीप सोनवणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *