अमळनेर येथे बच्चूभाऊ कडू व डॉ. योगेश महाजन यांची हितगुज बैठक – शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा
![]()
अमळनेर येथे बच्चूभाऊ कडू व डॉ. योगेश महाजन यांची हितगुज बैठक – शैक्षणिक, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा
अमळनेर प्रतिनिधी :
दि. २५ ऑगस्ट २०२५, वार सोमवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा. आ. बच्चूभाऊ कडू साहेब हे अमळनेर येथे भेटीस आले होते. यावेळी त्यांच्यासोबत परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा यांचे अध्यक्ष मा. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनीही हितगुज साधले.
या बैठकीत शैक्षणिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील वंचित घटकांसाठी अधिक उपयुक्त उपक्रम राबविण्याबाबत आणि शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही विचारमंथन झाले.
यावेळी मा नगर सेवक नानासाहेब विक्रांत पाटील, मारवाड संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव पाटील व विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते..

