शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा  अनिल बोरनारे यांनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार
1 min read

शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा अनिल बोरनारे यांनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार

Loading

शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा

अनिल बोरनारे यांनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई (प्रतिनिधी) गणेशोत्सवापूर्वीच आज मुंबईतील शिक्षक- शिक्षकेतरांचे वेतन खात्यात जमा झाले भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे प्रदेश निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांचे आभार मानले आहे.
ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन देण्याची मागणी भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती
२६ ऑगस्ट रोजी हरतालिका असून त्याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते राज्यभरामध्ये विशेषतः मुंबई व कोकणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच अनेक शिक्षक शिक्षकेतर बांधव गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी तसेच कोकणात मोठ्या संख्येने जात असतात.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यापूर्वी अनेकदा शासनाने गणेशोत्सवापूर्वी वेतन दिलेले असल्याने यंदाही गणेशोत्सवापूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतरांना ऑगस्ट पेड सप्टेंबर चे वेतन गणेशोत्सवापूर्वी दिले तर शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांना हा सण उत्साहाने साजरा करता येईल अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *