चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजतर्फे कुसुंबा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी , निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची नवी वाटचाल
![]()
चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजतर्फे कुसुंबा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी
निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची नवी वाटचाल
जळगाव प्रतिनिधी
दि. २५/०८/२०२५, वार सोमवार,रोजी. श्री.चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्यासाहेब पाटील यांच्या पत्नी, संस्थेचे सचिव मा.श्री. राहुल पाटील यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जि. प. उच्च प्राथमिक शाळा,कुसुंबा येथील सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करायचे शिबर संपन्न. यावेळी
जि.प.शाळा कुसुंबा येथील 50 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बसने श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व श्री.पी. ई.तात्या पाटील रुग्णालय चिंचोली येथे आणण्यात आले. येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत होमिओपॅथी औषधी चे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची पुढील काही दिवसात मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळतील त्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत मोफत चष्मा देण्यात येईल.
यावेळी विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी केले. होमिओपॅथी तज्ञ डॉ.अमिता श्रीवास्तव डॉ. हर्षा मुलांडे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स प्राची खलसे,श्रद्धा चौधरी, फैज खान यांनी विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, व होमिओपॅथी औषधी कशी घ्यावी यां बद्दल मार्गदर्शन केले.तसेच जि. प. शाळा कुसुंबा येथील शिक्षिका सुनीता भोळे, सोनाली मॅडम उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. ई. तात्या पाटील व त्यांच्या पत्नी सौ.निर्मलाताई पाटील हे उपस्थित होते.
श्री.चामुंडा माता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौ. निर्मलाताई पांडुरंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी निर्मलाताई यांनी विद्यार्थी सर्व डॉक्टर, प्राध्यापक,कर्मचारी वर्ग यांना मार्गदर्शन केले.
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री.राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले. यां कार्यक्रमाला प्रा. डॉ.संदीप गुरचर,श्री.अजय पाटील, चंद्रकांत पाटील, इरफान शेख व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते..



