ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन
1 min read

ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन

Loading

ई-पीक पाहणी रद्द करून तातडीने मदत द्या – अमळनेर शिवसेनेचे(उ.बा.ठा ) तहसीलदारांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

अमळनेर तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झाले आहेत. दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांद्री, पातोंडा, सोनखेडी, दापोरी, खोशी, खेडी, अमळगाव यासह अनेक गावांतील शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाऊन पिके जमीनदोस्त झाली. पूरामुळे जमिनीची सुपीक माती वाहून गेली असून शेतं नापीक झाली आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात पावसाचा अभाव असल्याने पिके करपली होती. दुबार संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. यात सरकारने ई-पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदन प्रसंगी उपस्थित मान्यवर :
शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, शहर संघटक मोहन भोई, उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, विलास पवार, बाळासाहेब पाटील, भय्या पाटील, जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, उपजिल्हा प्रमुख देवेंद्र देशमुख, शाखा प्रमुख मुस्ताक बागवान, रवींद्र पाटील (कुरे), भास्कर उत्तम पाटील (रनाईचे) तसेच युवा सेना उपतालुका प्रमुख गोकुळ कोळी, विजय पाटील, विजय हिम्मत पाटील यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *