स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत 
1 min read

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत 

Loading

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वडगाव प्रा.आ. शाळेत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव प्रा. अ. ता. पारोळा येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. योगिता मनोज पाटील, उपाध्यक्षा सौ. सोनाली अनिल पाटील, सर्व मान्यवर सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब ज्ञानेश्वर पाटील, नानासाहेब वामनराव पाटील, आबासाहेब सुभाष पाटील, नानासाहेब संभाजी पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब भिकन पाटील, तसेच गावातील मान्यवर दादासाहेब बाबूलाल पाटील, नानासाहेब अंबर पाटील, आबासाहेब आधार पाटील, लक्ष्मण पाटील, अंबू पाटील, अण्णासाहेब काशिनाथ पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाच्या पोलीस पाटील श्रीमती ज्योत्स्नाताई गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पती कै. गुलाबराव सखाराम पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग व कॅडबरी चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

त्यांच्या या दातृत्वपूर्ण कार्याचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत असून शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मोरे व प्रवीण सनेर सर यांनी त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *