“वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम – कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भालेराव नगरात वड-बेल वृक्षारोपण”
1 min read

“वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम – कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भालेराव नगरात वड-बेल वृक्षारोपण”

Loading

“वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम – कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भालेराव नगरात वड-बेल वृक्षारोपण”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):
शहरातील भालेराव नगर व पाटील गढी मित्र परिवार सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवत असतो. त्याच उपक्रमपरंपरेत आज एक वेगळा व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.
भालेराव नगरातील रहिवासी व अमळनेर तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक श्री. निलेश पाटील (इंधवेकर) यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने हिरवाईचा संकल्प करत वड व बेल वृक्षांचे वृक्षारोपण केले. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला हा हरित उपक्रम पर्यावरण संतुलनासाठी एक लहानसा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला.
मित्र परिवाराच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे पंचक्रोशीत त्यांचा लौकिक वाढला असून, समाजहित व पर्यावरण संवर्धनाची जाणीव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.
या प्रसंगी जेष्ठ सदस्य रामदास उपासनी, वसंतराव काटे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ आबा पाटील, व्ही. ए. पाटील, सदाशिव पवार, विजय पाटील, संजय मुसळे, सुनिल देवरे, अनिल दुसाणे, रामकृष्ण पाटील, योगेश खैरनार, डी. जी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
हरित उपक्रमाने वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची पद्धत समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

“पर्यावरण वाचवा – झाडे लावा, भविष्यास हिरवाई द्या!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *