“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा” ९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा”
![]()
“मूर्ती लहान पण कीर्ती महान –बापूसाहेब उपासनींच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरवसोहळा”
९१ वा वाढदिवस उत्साहात साजरा”
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) –
पाटीलगढी व भालेरावनगर कॉलनीचे पितामह, ज्येष्ठ मार्गदर्शक, भीष्माचार्य समान व्यक्तिमत्व म्हणून लौकिक असलेले बापूसाहेब रामचंद्र पुंडलिक उपासनी यांचा ९१ वा वाढदिवस रविवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगरूळ एमआयडीसी येथील शोभा इंडस्ट्रीजमध्ये शेकडो मान्यवर, रहिवासी, सर्व सहकुटुंब व बालगोपाळांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
🌸 कार्यक्रमाची सुरुवात व सूत्रसंचालन
प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले.
हरिचंद्र कढरे दादा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात करून वातावरण भारावून टाकले.
🌼 मान्यवरांची मनोगते
मनोगतामध्ये बापूसाहेब ए.डी. पाटील मारवड, मा.मुख्याध्यापक आबासाहेब सतीश देशमुख (सानेगुरुजी) यांनी कॉलनीतील ऐक्य व आदर्श कार्यपद्धतीचे कौतुक केले.
आबासाहेब गोकुळ पाटील (मा. केंद्रप्रमुख अमळनेर) यांनी अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब उपासनी यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करतांना सांगितले की –
“कर्म हाच वशिला, कार्यक्षेत्र हे तीर्थक्षेत्र” या भूमिकेतून त्यांनी तहसील कार्यालय जळगावपासून नायब तहसीलदार पदापर्यंत कोणताही डाग न लागता कार्य केले. पारोळा येथील धार्मिक कार्यासाठी त्यांना कलेक्टरांकडून २१ हजाराचे पारितोषिक मिळाले होते.बापूसाहेबांची प्रेरणादायी जीवनगाथा
१९३५ मध्ये अमळनेर पाठक गल्ली येथे जन्मलेल्या बापूसाहेबांचा जीवनप्रवास सेवाभावी व कार्यतत्परतेने समृद्ध आहे. ३१ मार्च २००३ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
स्वच्छ, पारदर्शक जीवन जगणारे, अध्यात्मप्रेमी, कृष्णभक्त व विठ्ठल भक्त असलेले बापूसाहेब आजही स्वयंभू, तंदुरुस्त आणि कार्यक्षम आहेत. वाचनाची आवड, समाजासाठी मार्गदर्शनाची वृत्ती आणि “मूर्ती लहान पण कीर्ती महान” हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे दर्शन आहे.🌹 सांस्कृतिक कार्यक्रम
गायक महेंद्रजी काटे, चंद्रात्रे बंधू, पत्रकार मिलिंद पाटील, तसेच लक्ष्मण पाटील यांच्या सुरेल गाण्यांनी कार्यक्रम रंगला.
स्मिता जितेंद्र चंद्रात्रे (महिला ग्राहक मंच अध्यक्ष व बापूसाहेबांची कन्या) यांनी पितृस्मरण करताना भावनिक मनोगत व्यक्त केले. त्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणारे दादासाहेब जितेंद्र चंद्रात्रे (शोभा इंडस्ट्रीजचे मालक) यांच्या कार्याची प्रशंसा केली.🌻 सन्मान व सत्कार
कार्यक्रमात बापूसाहेबांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाला २५० ते ३०० मान्यवर, राजकीय, सामाजिक, व्यापारी व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पाटीलगढी व भालेरावनगर येथील सर्व कुटुंबियांनी उपस्थिती लावली.समारोप
आभारप्रदर्शन बापूसाहेब संदीप पाटील (माजी जि.प. सदस्य) यांनी केले.
शेवटी सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून कॉलनीतील एकोपा, संस्कार, व सामूहिक कार्यसंस्कृतीचा सुंदर आदर्श संपूर्ण शहरासमोर उभा राहिला.






