मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर
1 min read

मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Loading

मुंबईत १९ जून रोजी महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
मुंबईत होत असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (प्रा./माध्यमिक) सुजाता खेर यांनी सही केलेल्या आदेशानुसार, महापालिका परिषदेतील सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित व बिनअनुदानित शाळांना बुधवार, दिनांक १९ जून २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी मुंबई महानगर पालिका क्षैत्रातील दुपारी सुट्टी जाहीर केली. परंतु विद्यार्थी शाळेत असल्याने दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली. परंतु मुंबईतील काही शाळा सकाळी 9.00 ते 3.00 या एकाच सत्रात भरत असल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना घरी परत जाताना गैरसोय झाली होती. यासंदर्भात परीपत्रक लवकर निघावे अशी मागणी पालकांनी केली होती.

या सुट्टीदरम्यान सर्व परीक्षा, अध्यापन व शालेय उपक्रम रद्द राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *