नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यापीठाने केला कार्य गौरव – सर्वोत्कृष्ट मूल्यांकन केंद्र पुरस्कार प्रधान
![]()
नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यापीठाने केला कार्य गौरव –
सर्वोत्कृष्ट मूल्यांकन केंद्र पुरस्कार प्रधान
अमळनेर प्रतिनिधी
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट मूल्यांकन केंद्र म्हणून गौरविण्यात आले असून, त्यांना प्रशस्तीपत्र व कार्यगौरव सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
हा सन्मान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत प्रदान करण्यात आला. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, माननीय राज्यपाल नियुक्त नामनिर्देशन व्यवस्थापन परिषद सदस्य व पर्यावरण तज्ञ राजेंद्र नन्नवरे तसेच सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या पुरस्कार समारंभात प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील व विभागप्रमुख व समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. जे. एस. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी आयोजकांचे आभार मानत समाजकार्य शिक्षणातील उच्च दर्जा व गुणवत्ता जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय सुभाष दोधू भांडारकर व चेअरमन अभिजीत भाऊ भांडारकर यांनी हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.
या सन्मानामुळे श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या कार्याला अधोरेखित महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासोबतच समाजकार्य व्यवसाय बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

