अडचणींवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – खेडी प्र.ज. गावातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश
![]()
अडचणींवर मात करून वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – खेडी प्र.ज. गावातील विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील खेडी प्र.ज. हे छोटंसं गाव आज संपूर्ण परिसरात अभिमानाने डोकं वर काढतंय. कारण, या गावातील तीन विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवत आपले नाव इतिहासात कोरून ठेवलं आहे.
साधनसंपत्ती अपुरी, आर्थिक परिस्थिती कठीण, आणि अभ्यासासाठी सोयी-सुविधांचा अभाव… या सगळ्या अडथळ्यांवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अपार आत्मविश्वासाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना वास्तवात उतरवलं आहे.
चेतन शशीकांत पाटील – जे.जे. मेडिकल कॉलेज, मुंबई
मृण्मय किरण पवार – सायन व नायर मेडिकल कॉलेज, मुंबई
यश महेश पवार – कराड मेडिकल कॉलेज, कराड
“जिद्द असेल तर स्वप्ने साकार होतात” या उक्तीला सत्यात उतरवत या तिघांनी आपल्या छोट्याशा गावाचं नाव वैद्यकीय क्षेत्रात उजळवलं आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे गावभर आनंद, अभिमान आणि उत्सवाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या यशाबद्दल गावातील मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मा.मुख्याध्यापक टी.पी. पाटील, श्री विलास शिंदे, श्री प्रबोधन पवार, प्रा.डी.आर. पवार, श्री महेंद्र वारूळे, शिवाजी वारूळे, डॉ.संजय पवार, श्री हिरालाल पवार, श्री चंद्रकांत पाटील, प्रा.शाम पवार यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का.सो. चेअरमन, संचालक तसेच अमळगाव व खेडी गावचे समस्त ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
खेडी गावाच्या मातीतून घडलेले हे तीन तेजस्वी हिरे आता वैद्यकीय क्षेत्रात नवी कामगिरी करतील, असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यांचे हे यश केवळ गावापुरतं न राहता भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे.

