1 min read

देवगाव-देवळीमध्ये देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा – महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणात ऐतिहासिक सोहळा

Loading

देवगाव-देवळीमध्ये देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा – महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणात ऐतिहासिक सोहळा

अमळनेर प्रतिनिधी –
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देवगाव-देवळी ग्रामस्थांनी एकत्रितपणे देशभक्तीचा महासोहळा अनुभवला. पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत गावातून निघालेल्या प्रभात फेरीने “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी वातावरण भारून टाकले. स्वातंत्र्याच्या जयघोषाने गावाचा प्रत्येक कोपरा जागृत झाला.
ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या ध्वजारोहणानंतर संचालक मंडळ, गावकरी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि मान्यवर महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलच्या पटांगणात मोठ्या संख्येने एकत्र जमले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्काऊट शिक्षक एस.के. महाजन यांनी उत्तमरीत्या केले.
या ऐतिहासिक क्षणी देवगाव-देवळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र कौतिक पाटील यांच्या हस्ते तिरंग्याला मानाचा मुजरा देण्यात आला. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी गिरीजा माळी, वैष्णवी भरत पाटील, वैष्णवी श्याम पाटील, निशा जाधव, नुतन पाटील व शुभांगी पाटील यांनी सादर केलेले झेंडा गीत आणि राज्यगीत यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले.
मुख्याध्यापक अनिल गंगाधर महाजन यांनी सर्व मान्यवरांचे, ग्रामस्थांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आय.आर. महाजन, एच.ओ. माळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील आणि गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.
देशभक्तीच्या घोषणांनी, तिरंग्याच्या साक्षीने आणि गावकऱ्यांच्या एकतेने भारलेला हा सोहळा, देवगाव-देवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय पान ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *