आदर्श माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
![]()
आदर्श माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
धुळे प्रतिनिधी
धुळे येथील उद्यानपंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय दोंदे कॉलनी,देवपूर धुळे येथे 79 वा स्वातंत्र्य दिन संस्थेचे सचिव आदरणीय बाळासाहेब ॲडव्होकेट श्री.सुनीलजी सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी माजी सैनिक दादासाहेब श्री.विलासराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाजन हायस्कूल येथील माजी प्राध्यापक श्री.अण्णासाहेब माळी, तसेच जायन्टस् सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सौ.सीमा चौधरी तसेच सदस्य सौ.रेखाताई राजपूत ,श्रीमती इंदुमती जगताप ,आदर्श छात्रालयाचे अधीक्षक श्री.उत्तम गवळी आप्पासाहेब एकनाथ बोरसे आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचे अधीक्षक श्री.विकास सूर्यवंशी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता आठवीचा विद्यार्थी विपुल वैष्णव याने प्रस्ताविक केले तद्नंतर विद्यालयातील विद्यार्थी रोहिदास पावरा ,इच्छा अहीरे व सियाराम पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले*.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी धनश्री शिंपी व इयत्ता आठवीचा विद्यार्थी विपुल वैष्णव यांनी केले तर सांस्कृतिक प्रमुख श्रीमती.संगीता चौधरी मॅडम* यांनी सर्व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अण्णासाहेब माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतंत्र भारताचे कर्तव्यशील नागरिक होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तात्यासाहेब श्री.ज्ञानेश्वर सोनवणे सर यांनी सर्व प्रमुख अतिथींचे आभार मानले ,तसेच आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉक्टर श्री.सुरज सोनवणे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला म्हणून डॉक्टर साहेबांचे विशेष आभार मानले.
शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.ऋषिकेश महाजन सर यांनी खडे व बैठे कवायतीचे प्रकार देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

