म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न
1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

 

भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.संपूर्ण शाळा रांगोळ्या, पताकांनी सजविण्यात आली होती व सकाळपासून देशभक्तीपर गीतांनी शालेय परिसर दणांनला होता. अतिशय प्रसन्न वातावरणात शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वज संचलन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले . सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी,शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राष्ट्रगीत, राज्य गीत, व झेंडा गीत म्हटली . त्यानंतर सर्वांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. तदनंतर विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली. व नंतर विद्यार्थ्यांना व सर्व उपस्थितांना , मोतीचुराचे लाडू, शेव चिवडा, बिस्कीट पुडे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *