प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण -प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांचे प्रतिपादन नोबेल फाउंडेशन तर्फे व्याख्यान संपन्न
![]()
प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण -प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांचे प्रतिपादन
नोबेल फाउंडेशन तर्फे व्याख्यान संपन्न
जळगांव प्रतिनिधी
( – “प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण आहे ,मानव एकमेव प्राणी प्रश्न विचारू शकतो “असे प्रतिपादन प्रसिद्ध विज्ञान लेखक नितीन हांडे यांनी केले.नोबेल फाउंडेशन आयोजित ‘युवक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते .याप्रसंगी मंचावर नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील ,तज्ञ प्राध्यापक सुधीर महाले, जयवीर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी नितीन हांडे यांचा शाल,श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.डॉ नितीन हांडे यांची आपले भवताल, इस्रो, कीटक इत्यादी पुस्तके सध्या लोकप्रिय आहेत.
पुढे बोलताना श्री हांडे म्हणाले की,विज्ञान हे वैश्विक सत्य आहे .कोणत्याही समस्येला विवेकाने सोडवता येते .समाजातील अंधश्रद्धा या देशाला अधोगतीकडे नेत असतात. जिथे प्रीती आहे ती श्रद्धा आहे जिथे भीती आहे ती अंधश्रद्धा आहे. समाजाला भीती दाखवणारे व्यक्ती संत होऊ शकत नाहीत संत हे समाजाला निर्भय बनवतात व सदाचाराची दिशा देतात. युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाबद्दल प्रचंड आकर्षण आणि अभ्यास असायला हवा. येणारा काळा हा फक्त तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले सूत्रसंचालन जयविर पाटील यांनी तर आभार विवेक साळुंखे यांनी मानले. उपस्थित आमच्या प्रश्नांना श्री हांडे यांनी उत्तरे दिली. मोठ्या संख्येने युवा वर्ग व्याख्यानाला उपस्थित होता.
फोटो-
नितीन हांडे यांचा सन्मान करताना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील ,सुधीर महाले ,जयवीर पाटील

