कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !
![]()
*कु.सर्वेशा शेळके हिचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश !*
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
सांगली जिल्ह्या शिराळ्यातील सक्सेस अकॅडमीच्या कु. सर्वेशा शेळके हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले, याबद्दल अरविंद बुद्रुक संचलक वारणा बँक यांच्या हस्ते लकी मंगल कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर मुटकुळे, आचार्य अकॅडमी बारामती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सक्सेस अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचाहि सत्कार याठिकाणी करण्यात आला.
विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सक्सेस अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना पहिल्यापासून प्रशिक्षित करण्यात या शिक्षणसंस्थेचा भर राहिला आहे. सतत सराव, परीक्षा व सखोल अभ्यास अशा बाबींवर लक्ष दिल्यामुळे येथील विद्यार्थी विविध परीक्षेत यश संपादित करत असल्याचे सक्सेस अकॅडमीचे प्रमुख वर्धमान बुद्रुक यांनी सांगितले. कु. सर्वेशा शेळके हिच्या या यशामागे सक्सेस अकॅडमीच्या प्रतिभा बुद्रुक, भरत बोरगे, सारिका बोरगे व प्राचार्य सुरेश मगदूम, स्वप्नाली मगदूम, प्रा. सुधीर मगदूम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

