लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर
1 min read

लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर

Loading

लेखणीचा अमृत महोत्सव : ज्येष्ठ पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर

अमळनेर प्रतिनिधी
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाला गवसणी घालणारे कवी साहित्यिक आणि पत्रकार सुभाषदादा पाटील घोडगावकर !
महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार कवी साहित्यिक माननीय श्री दादासाहेब सुभाष मोतीराम पाटील (घोडगावकर) यांचा जन्म भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे झाला. भारताचा स्वातंत्र्यदिन जन्मदिवस एकाच दिवशी येणे म्हणजे परम भाग्याचे लक्षण होय भारताचा पहिला स्वातंत्र्यदिनाला गवसणी घालणारे सुभाष दादा पाटील यांना मकसूद बोहरी मित्रमंडळातर्फे मानाचा मुजरा करून त्यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सव दिनी त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे जन्मशताब्दी साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे, ही प्रभू चरणी विनम्र प्रार्थना !
सुभाषदादा पाटलांचे प्राथमिक शिक्षण घोडगाव येथे झाले तसेच माध्यमिक शिक्षण इयत्ता आठवीचे शिक्षण अमळनेर च्या प्रताप हायस्कूल येथे झाले त्यानंतर नववी, दहावी, अकरावी माध्यमिक शिक्षण घोडगाव येथेच झाले तसेच जळगावच्या कृषी महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर कोणत्याही प्रकारची नोकरी न करता त्यांनी आपले आयुष्य पत्रकारिता व साहित्यासाठी वाहून घेतले सन 1970 पासून जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केले तसेच साहित्यात देखील अनेक प्रकारचे लिखाण करून आजपर्यंतची त्यांची 9 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या प्रौढ प्रशिक्षणात औरंगाबाद येथील लेखक शिबिरात त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे तसेच महाराष्ट्र शासनातर्फे वर्धा येथील सेवाग्राम या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळी ते आठ दिवस मुक्कामी होते त्यावेळेस त्यांची भेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सुनबाई व आचार्य राजगोपालचारी यांची मुलगी निर्मला गांधींची प्रत्यक्षात भेट झाली होती या भेटीमध्ये त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आयुष्यावरील अनेक पैलूंची महत्वपूर्ण माहिती मिळाली. या भेटीचे रूपांतर त्यांनी ऊन सावली या पुस्तकात केली आहे सदरचे पुस्तक कुष्ठरोग रोगीवर लिहिलेले आहे. जळगाव येथील साप्ताहिक प्रबोध चंद्रिका या पेपर मध्ये 1968 त्यांची पहिली कविता छापून आली होती त्यावेळेस त्यांना मनापासून खूप मोठा आनंद झाला होता या पेपर मध्ये धरणगावचे बालकवी ठोंबरे यांच्या कवितादेखील छापल्या जात होत्या. त्याच प्रमाणे दैनिक गावकरी दैनिक बातमीदार दैनिक लोकमत या नावाजलेल्या वृत्तपत्रांत देखील त्यांचे लेख आणि कविता प्रसिद्ध होत होते. त्यांचे परमपूज्य पिताश्री मोतीरामजी पाटील हे नावाजलेले स्वातंत्र्यसैनिक होते तसेच वेळोदे येथील प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक होते त्यांना चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत त्यापैकी मोठे भाऊ एल एम पाटील हातेड ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य असून त्यांनी काही वर्ष अमळनेरच्या नगरपालिका मराठी शाळा नंबर12 मध्ये काही वर्षे नोकरी केली होती आज त्यांचे वय 88वर्ष सुरू आहे यांचे सुपुत्र प्रदीप पाटील हे चोपडा तालुका काँग्रेस कमिटीचे विद्यमान तालुका अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मोठे बंधू कै. रामराव पाटील यांचे वयाच्या 83 व्या वर्षी दुःखद निधन झाले. 4 नंबरचे बंधू डी. एम. बाविस्कर हे अमळगावच्या नूतन मराठा हायस्कूल येथे शिक्षक आहेत. मुडी शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन कै.विनायकदादा पाटील यांची सुविद्य पत्नी कमलबाई पाटील या मोठ्या भगिनी आहेत त्याचप्रमाणे मोहाडी येथील विमलबाई पाटील आणि मुडी मांडळ येथील प्रमिलाताई पाटील यादेखील भगिनी आहेत सुभाषदादा पाटील यांना आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या आमच्या आवडत्या काकू रेखाताई पाटील यांनी बहुमोल अशी साथ दिलेली आहे त्यांच्या साथीमुळे आमचे काकाश्री विविध क्षेत्रात आणि विविध स्तरावर विपुल असे लिखाण करू शकले माझे काका कै सुरेश गुलाबराव मिस्तरी यांचे सुभाषदादा हे परममित्र होते त्यामुळे सुभाषदादा पाटील यांचे आमच्या देशमुख गल्लीतील निवासस्थानी मागील 60 वर्षापासून येणे-जाणे सुरू आहे
सुभाषदादा पाटील यांना महाराष्ट्राचे आवडते लेखक कोण ? असा प्रश्न विचारला असताना त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज आणि शंकर पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला तसेच पत्रकारिता या क्षेत्रातील तुमचे आदर्श कोण ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नाशिकचे दादासाहेब पोतनीस आचार्य प्र. के. अत्रे व त्यांची मुलगी शिरीष पै, धुळ्याचे भाई मदाने व अमळनेरचे कैलासवासी माधवरावजी सुतार यांचा नामोल्लेख केला. पूर्वी जळगाव आकाशवाणी केंद्रावर कैलासवासी माधवराव सुतार यांचे जळगाव जिल्हा वार्तापत्र प्रसारित होत होते व त्यांच्या नंतर जळगाव जिल्हा वार्तापत्र प्रसारित होण्याचा मान सुभाषदादा पाटील यांनाच मिळाला. नवीन पत्रकारांना तसेच नवीन साहित्यिकांना तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या अमृतमहोत्सवी प्रसंगी काय संदेश द्याल ? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, साहित्यिकांनी भरपूर वाचन करावे आणि भरपूर लिहावे तसेच पत्रकारांनी फक्त बातम्या न देता बातमी मागची बातमी काढण्याचे कसब ठेवावे आणि समाजाचे ज्वलंत सामाजिक प्रश्नावर भरपूर लिखाण करावे . थोडक्यात म्हणजे काय साहित्यिक आणि पत्रकारांनी वाचाल तर वाचाल असा मौलिक संदेश दिलेला आहे
एक अभ्यासू, जिज्ञासू पत्रकार व साहित्यिक सुभाषदादाच्या आयुष्यात काही वर्षापूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला त्यावेळेस त्यांचा उजवा हात आणि उजवा पाय पूर्णपणे निकामी झालेला होता त्याच वेळेस असे वाटत होतं की सुभाष पाटील यांचे लिखाण येथेच थांबणार का ? परंतु त्या प्रसंगी देखील सुभाषदादा पाटील यांनी मोठ्या हिमतीने व सौ रेखा काकू यांच्या सहकार्याने मोठ्या जिद्दीने प्रसंगाला सामोरे जाऊन आणि प्रसंगावर पूर्णपणे मात करून पुनश्च एकदा डाव्या हाताने लिखाणाला सुरुवात करून साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रांमध्ये एक नवीन यशस्वी पायंडा पाडून दिला. आज ते पत्रकार दिनाला जळगाव येथे जाऊन अवश्य भेट देतात. सन 2002 साली जळगाव येथे जळगाव जिल्हा मराठी साहित्य संमेलन झालेले होते या साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा बहुमान सुभाषदादा पाटील यांना मिळालेला होता ते साक्षरता समितीचे सदस्य असून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करीत आहे. सुभाष पाटील घोडगावकर यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात पाऊलखुणा, वेदना, वसन्त वादळ, कडू-गोड, ऊन सावली अशी उत्कृष्ट पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ऊन सावली या पुस्तकाचे महाराष्ट्र शासन चौदा भाषांमध्ये प्रकाशन करणार आहे तसेच हिरवा शेला या मराठी चित्रपटासाठी काही गाणी देखील लिहिलेली आहेत परंतु अचानक झालेल्या अपघातात एक उजवा पाय व उजवा हात निकामी झाला सारं काही स्वप्नच राहिलं ते विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी असून एक शासनमान्य पत्रकार आहेत सन 1991 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे विविध वृत्तपत्रातून चौफेर लिखाण करून त्यांनी अंधारातील दिवे चैतन्याचे झरे ही सदरे गाजवलेली आहेत. अशा या कर्तुत्ववान लेखकाला साहित्यिकाला आणि पत्रकाराला आम्ही त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवशी लाख लाख शुभेच्छा देत आहोत अजून त्यांच्याकडून अनेक प्रकारचे साहित्य समाजाला अपेक्षित आहे मी एकच म्हणेल , उठ मराठा उठ ! महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी लेखणी घेऊन पेटून उठ !!

जय हिंद जय महाराष्ट्र
सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे.

………………………………….————————

 

मराठी लाईव्ह न्युज

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुभाष पाटील घोडगावकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी जन्मलेले हे शब्दांचे साधक, लेखणीला शस्त्र मानून आयुष्यभर पत्रकारिता व साहित्य सेवेत रत राहिले.
त्यांच्या लेखणीतून समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फुटली, साहित्याला नवा चेहरा मिळाला आणि सत्याला ठाम आवाज लाभला.
पत्रकारितेत ‘बातमी मागची बातमी’ काढण्याची त्यांची वृत्ती आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.
‘ऊन सावली’सारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी जीवनातील कटू-गोड अनुभव वाचकांसमोर ठेवले.
अपघातानंतरही अपार जिद्दीने पुन्हा लेखन सुरू करून त्यांनी नवी प्रेरणा दिली.
महाराष्ट्राच्या साहित्यविश्वातील त्यांचे योगदान अनमोल आहे.
त्यांच्या लेखणीचा प्रवास अशीच उजळणी करत राहो आणि महाराष्ट्राला नवे विचार देत राहो, हीच प्रार्थना.

🎂💐🎂🎂🎂🎂🎂

— शुभेच्छुक : ईश्वर महाजन, पत्रकार, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *