२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन
1 min read

२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन

Loading

 

२२ वर्षांचा संघर्ष फळाला – सात्री धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन

अमळनेर प्रतिनिधी – ईश्वर महाजन
सात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावकऱ्यांचा २२ वर्षांचा संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यानंतर व सात्री पुनर्वसन कृती समितीच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा व आनंदाचे वातावरण आहे.
धरण निर्मितीमुळे आपली घरे, शेती व उपजीविका गमावलेल्या सात्री गावातील शेकडो कुटुंबांना गेली दोन दशके योग्य पुनर्वसनाची प्रतीक्षा होती. अनेक वेळा आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात प्रक्रिया लांबत राहिली. गावकऱ्यांनी याबाबत वारंवार आंदोलन, निवेदन व बैठकींद्वारे आवाज उठवला.
अलीकडे झालेल्या पुनर्वसन आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाने पुनर्वसनासाठी आवश्यक कागदपत्रे, मोजणी, प्लॉट वाटप व आवश्यक सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन स्थळी जागा मिळावी, अशी कार्ययोजना सादर करण्यात आली.
कृती समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी हे आश्वासन स्वागतार्ह असल्याचे सांगत, मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. “२२ वर्षे आम्ही संयम पाळला, आता संयमाचा अंत झाला आहे. प्रशासनाने ही अंतिम मुदत पाळलीच पाहिजे,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सात्री गावकऱ्यांचा हा लढा केवळ पुनर्वसनासाठी नाही, तर स्वाभिमान, हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आहे. ३० सप्टेंबर हा दिवस गावकऱ्यांच्या आयुष्यात नवा अध्याय लिहिणारा ठरेल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *