वैजापूर आणि मुळ्यावतार येथे हरघर तिरंगा अभियान* — *समाजकार्य महाविद्यालय चोपड्याचा स्वातंत्र्य* *दिनाच्या पूर्व संध्येला अभिनव उपक्रम –*
![]()
*वैजापूर आणि मुळ्यावतार येथे हरघर तिरंगा अभियान* —
*समाजकार्य महाविद्यालय चोपड्याचा स्वातंत्र्य* *दिनाच्या पूर्व संध्येला अभिनव उपक्रम –*
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे हर घर तिरंगा अभियान २०२५ अंतर्गत भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या क्षेत्रकार्याअंतर्गत निवडलेल्या वैजापूर आणि मुळ्यावतार या गावांमध्ये तिरंगा रॅली काढून राबवण्यात आले. सदरील अभियानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदणकर आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करण्यात आले. हर घर तिरंगा अभियान २०२५ अंतर्गत तिरंगा रॅली चे उद्घाटन सरपंच मा.श्री. दत्तरसिंग सुभाष पावरा (वैजापूर मुळ्यावतार ग्रुप ग्रामपंचायत) यांनी केले, या अभियानाकरिता गावातील नागरीक, शालेय विद्यार्थी आणि समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तिरंगा रॅली मध्ये गावातील नागरिकांमध्ये तिरंगा जनजागृती, तिरंगा वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने तिरंगा फडकवण्या संदर्भात जनजागृती व आव्हान करण्यात आले. सदरील हर घर तिरंगा अभियान २०२५ चे आयोजन समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा. डॉ. मोहिनी उपासनी व प्रा. डॉ. मारोती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.

