भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात.
1 min read

भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात.

Loading

भुसावल मधे भव्य तिरंगा रैली का आयोजन उत्साहात.

(मुख्य आकर्षण सेंट अलाॅयसेस हायस्कूल च्या 46 विद्यार्थ्यांचे सुंदर असे बँड पथक राहिले )भुसावळ – नगरपरिषद भुसावळ व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यामाने हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथून रॅली ची सुरुवात करण्यात आली. सदर आलेला तिरंगी बलून हवे सोडून व हिरवा झेंडा दाखवून गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे,उपमुख्यधिकारी परवेज शेख, कार्यालय अधीक्षक अजित भट, आस्थापना प्रमुख वैभव पवार, कर निरीक्षक दीपक अहिरे, अग्निशामन अधिकारी विवेक माकोडे, शाळेचे मुख्याध्यापक एस जी मेढे . कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी डॉ. प्रदीप साखरे , असलम खान,( ट्राफिक पीएसआय) यांच्यासह म्युनिसिपल हायस्कूल, डी.एस. भुसावळ, महाराणा प्रताप विद्यालय, वर्ल्ड स्कूल, सेंट अलाॅयसेस हायस्कूल, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, संत गाडगेमहाराज हिंदी विद्यालय, ताप्ती स्कूल, नाहाटा कॉलेज, डी.एल. हिंदी विद्यालय, बियाणी पब्लिक स्कूल, के नारखेडे विद्यालय, यासह विविध शाळा व शाळांचे शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले. सुरुवात होऊन समारोप धिस हायस्कूलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती झाला. समारोपसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले व सर्व उपस्थित कर्मचारी सर्व विद्यार्थी , शिक्षक शिक्षिका यांनी शपथ घेतली, व संविधान उद्देशिकेचे वाचन केले तदनंतर भारत माता की जय या जयघोषाने परिसर दणांनला सेंट अलाॅयसेस विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी म्युनिसिपल हायस्कूल व पी.एम. श्री द.शि.विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *