व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड* येथे स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
![]()
*व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड* येथे स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
शिरुड (दि. १३ ऑगस्ट २०२५) – शिरुड येथे आज एक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्रवीण शालिग्राम मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (ए.सी.पी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजनाने झाली.त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी, वेळेचे नियोजन, अभ्याससाहित्याची निवड आणि मुलाखतीतील आत्मविश्वास याबाबत सविस्तर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणात कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येय निष्ठा यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिग्राम मोरे साहेब, निवृत्त (पीएसआय), हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन करत त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी *शालेय समितीचे सदस्य* सौ. योजना पाटील मॅडम , श्री.शशिकांत रघुनाथ पाटील *( ग्रंथालय संघाचे ता.अध्यक्ष)* , श्री.अनिल सूर्यवंशी सर *मुख्याध्यापक* , हेमंत सोनवणे ,गावकरी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक/ शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे
*सूत्रसंचालन:-* श्री.गुलाब बोरसे सर यांनी केले तर
*आभार प्रदर्शन:-* श्री. पी. जे. निकम सरांनी केले. तसेच नागरिकांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

