मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या अनिल बोरनारे यांची मागणी
![]()
मुंबईतील शाळांना १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची सुट्टी द्या
अनिल बोरनारे यांची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील शाळांना असलेली दही हंडी व गोपाळकाला ची सुट्टी कायम ठेवण्याची मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गोपाळकाला- सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. मुंबईत दोन्ही सणांच्या दिवशी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर असते. अनेक रस्ते बंद केल्याने वाहतूक कोंडी होत असते.
त्यामुळे १६ ऑगस्ट गोपाळकाला आणि ०६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीची रद्द केलेली सुट्टी पूर्वीप्रमाणे कायम करून शासन निर्णय/परिपत्रक निर्गमीत करण्याची विनंती अनिल बोरनारे यांनी केली आहे

