राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त उदया उल्लेखनीय व्यक्तींचा होणार पुरस्काराने गौरव
![]()
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त उदया उल्लेखनीय व्यक्तींचा होणार पुरस्काराने गौरव
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)— भारतीय इतिहासातील आदर्श प्रशासन, न्यायप्रियता आणि समाजकल्याणाची प्रेरणा असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, दिनांक १३ ऑगस्ट २०२५, बुधवार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा “राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे.
हा भव्य सोहळा सकल धनगर समाज अमळनेर आणि मौर्य क्रांती संघ अमळनेर, जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, ट्रॉफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्रग्रंथ, दुपट्टा, शाल, मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ असे असेल.
समारंभाचे ठिकाण — कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर असून, कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ५:३० वाजता निश्चित करण्यात आली आहे.
आयोजकांमध्ये समाधान धनगर (संचालक, कृ. ऊ. बा. समिती अमळनेर), नितीन निळे (सभापती, शिक्षण समिती, नगर परिषद अमळनेर), एस. सी. तेले सर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट भ. ज. सेल), हरचंद लांडगे (प्रदेश सदस्य, भाजपा महाराष्ट्र), रमेश शिरसाठ (अध्यक्ष, हमाल मापाडी संघ अमळनेर), गोपिचंद शिरसाठ (अध्यक्ष, मौर्य क्रांती संघ अमळनेर), प्रदीप कंखरे (सामाजिक कार्यकर्ते), आनंदा धनगर (माध्यमिक शिक्षक), विकास सूर्यवंशी (शाखाध्यक्ष, मंगरूळ ता. अमळनेर) आणि सर्व सकल धनगर समाज बांधवांचा समावेश आहे.
कार्यक्रमात उपस्थित राहून, समाजहितासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 🌹

