श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक
![]()
*श्री मंगळ ग्रह मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक*
अमळनेर : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भारतातील एकमेव ख्यातनाम श्री मंगळ मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो.
११ रोजी, तिसऱ्या सोमवारी पालघर जिल्ह्यातील जि. प. शिक्षक आणि वाशिम येथील रहिवासी गजानन एकनाथ आरु हे सहपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तीमय व चैतन्य वातावरणात गणपती पूजन करून महादेवाचा अभिषेक करण्यात आला. मंगळ मंदिराचे पुरोहित मंदार कुलकर्णी आणि तुषार दीक्षित यांनी पौरोहित्य केले. त्यांना गोपाल पाठक यांचे सहकार्य लाभले. महाआरतीने रुद्राभिषेकाची सांगत झाली. यावेळी मंगळवार सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी यासह मंदिरातील सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

