श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न
1 min read

श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न

Loading

श्री मंगळ जन्मोत्सवाचा महासोहळा : भव्य आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न

अमळनेर प्रतिनिधी

येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात २ सप्टेंबर रोजीचा श्री मंगळ जन्मोत्सव हा अभूतपूर्व आहे . या महासोहळ्याच्या नियोजनाबाबत १० रोजी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महासोळ्याच्या एकूणच आयोजन आणि नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात आल्या.

या बैठकीत मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी २९ व ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तीन दिवसांच्या भरगच्च व भव्य धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत माहिती सांगितली. श्री मंगळग्रह मंदिराकडे येणाऱ्या मार्गाजवळील भव्य प्रवेशद्वार, त्याठिकाणीच अभिषेक, महाप्रसाद बुकिंग काऊंटर, चौकशी कक्ष, मदत कक्ष, चहा कॉफी व पाण्याची स्टॉल स्थायी व अस्थायी स्वरूपाची स्वच्छतागृहे, वैद्यकीय कक्ष, चोपडा रोडलगतच्या उघड्या भूखंडावर चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, त्याचठिकाणी देखरेखीसाठी मोठा टॉवरची उभारणी, मंदिर परिसरातील पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग, अपंग, वृद्धांसाठी व्हिल चेअरची सुविधा, मोबाइल्ससाठी स्वतंत्र टॉवर उभारणी, सर्व प्रकारचे अभिषेक व शांतीसाठीची भव्य व्यवस्था ,चोपडा रस्त्यापासून ते मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वॉटरप्रुफ पेंडॉलची उभारणी, चोपडा रोडवरील शासकीय वसतीगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराकडे जाण्यासाठी प्रवेशद्वाराची उभारणी करुन त्याठिकाणी चौकशीकक्ष, सुरक्षा रक्षक तसेच वसतीगृहाच्या परिसरातील मोकळ्या जागेत दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणे, सध्याच्या चप्पलस्टँड जवळ ऑनलाइन, डिजिटल, सीसीटीव्ही कक्षाची उभारणी, मंदिराच्या उजव्या बाजूला मोकळ्या जागेत एकाचवेळी सुमारे २५ हजार भाविक महाप्रसादाचा लाभघेऊ शकतील याबाबतची माहिती दिली. सर्वांना संपूर्ण मंदिर परिसर व सर्व व्यवस्था प्रत्यक्ष दाखविण्यात आल्या.
यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *