शतक महोत्सवात गुणवंतांचा गौरव आणि आरोग्य सेवांचे लोकार्पण!  दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन १० ऑगस्टला
1 min read

शतक महोत्सवात गुणवंतांचा गौरव आणि आरोग्य सेवांचे लोकार्पण! दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन १० ऑगस्टला

Loading

शतक महोत्सवात गुणवंतांचा गौरव आणि आरोग्य सेवांचे लोकार्पण!

दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन १० ऑगस्टला

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ व गरजू, गंभीर रुग्णांसाठी आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण बँकेतर्फे शकत महोत्सवी वर्षानिमित्त १० ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सकाळी ९ वाजता इंदिरा भवन अमळनेर येथे आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे.
शतक महोत्सव साजरा करणाऱ्या दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचेवतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने इ १० वी व १२ वी यात ७५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या बँकेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात येणार आहे. याकरिता सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रकाची झेरॉक्स कॉपी बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांचेशी संपर्क साधून जमा करावेत.
बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू, गंभीर रुग्णांसाठी उपचारांनंतर लागणाऱ्या महागड्या आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण सदरच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. तरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन चेअरमन पंकज मुंदडे , व्हाईस चेअरमन रणजित शिंदे व्यवस्थापक अमृत पाटील यांचे सह संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *