“उत्कृष्ट महसूल सेवेसाठी श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांचा सन्मान!”
![]()
“उत्कृष्ट महसूल सेवेसाठी श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांचा सन्मान!”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्यगिरीचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या महसूल दिनाच्या निमित्ताने यावर्षीही विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी चोपडा येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात, २०२४-२५ या वर्षात महसूल विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हा गौरव प्रांताधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे साहेब, तहसीलदार अमळनेर मा. रुपेशकुमार सुराणा साहेब तसेच तहसीलदार चोपडा मा. भाऊसाहेब थोरात साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांनी आपल्या प्रामाणिक कार्यपद्धती, तळमळीने केलेली सेवा, नागरिकांशी सौहार्दपूर्ण वागणूक आणि वेळेवरचे निर्णय या सर्व गुणांच्या आधारे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर घातली आहे.
त्यांच्या या सन्मानाने तालुक्यात व प्रशासकीय वर्तुळात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. त्या पक्षीमित्र अश्विन पाटील सर यांच्या पत्नी आहेत..
🌟 अभिनंदन संदेश 🌟
मराठी लाईव्ह न्युजच्या वतीने…श्रीमती कल्याणी निंबा पाटील यांना
महसूल प्रशासन अंतर्गत २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल
प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या हस्ते सन्मानप्राप्त झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!आपल्या सेवाभावी वृत्तीला, प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेला व समाजहितार्थ केलेल्या योगदानाला मिळालेला हा सन्मान म्हणजे एक प्रेरणादायी घटना आहे.
आपले कार्य भविष्यकाळातही अशीच प्रेरणा देत राहो, हीच अपेक्षा.– ईश्वर आर. महाजन
मुख्य संपादक
मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क


