शासन आपल्या दारी!  गांधली येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १७ गावांतील शेकडो नागरिकांचा सहभाग
1 min read

शासन आपल्या दारी! गांधली येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १७ गावांतील शेकडो नागरिकांचा सहभाग

Loading

शासन आपल्या दारी!

गांधली येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १७ गावांतील शेकडो नागरिकांचा सहभाग

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दि. २५ मार्च २०२५ च्या आदेशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण साधण्यासोबतच सामान्य जनतेच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील नगाव मंडळात येणाऱ्या गांधली येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ (सोमवार) रोजी दत्त मंदिर परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रशासन सज्ज – जनतेचा प्रतिसाद भरघोस

सदर शिबिरात नगाव बु., देवळी, देवगांव, धुपी, गडखांब, कचरे, मांजर्डी, नगाव खु., गांधली, पिळोदा, नंदगांव, लाडगांव, आमोदे, तासखेडा, दरेगांव, दहिवद, दहिवद खु. या १७ गावांतील नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेतला.

अनेक विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती

या शिबिरात तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले, तसेच पंचायत समिती, बालविकास, आधार केंद्र, सेतु कार्यालय आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सेवा, सुविधा आणि तत्काळ निर्णय

शिबिरादरम्यान विविध विभागांनी स्टॉल उभारून नागरिकांच्या तक्रारी, निवेदने स्वीकारून त्यावर तत्काळ कारवाई केली.
प्रमुख कामगिरी पुढीलप्रमाणे:

तहसील कार्यालय (पुरवठा शाखा):
१३७ नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप
संगायो शाखा:३२५ डीबीटी प्रक्रिया पूर्ण
११ नवीन लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले
सेतु कार्यालय:२९७ उत्पन्न दाखले,१०७ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,१६७ रहिवासी प्रमाणपत्र
११३ जातीचे दाखले,१७ आधार नोंदणी
४९ आधार दुरुस्ती,पंचायत समिती (MGNREGA):,०२ जलतारा योजना मान्यता,बालविकास विभाग:०४ लाभार्थ्यांना बेबी कीट वितरण करण्यात आले
या शिबिरात सुमारे ८५० ते ९०० नागरिकांनी उपस्थित राहून विविध सेवा घेतल्या. महिलांनी, शेतकऱ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी शिबिरात सहभाग घेत समाधान व्यक्त केले.

मंडळ अधिकाऱ्यांचे आभार प्रदर्शन

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी श्री. व्ही. पी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून त्यांनी या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवा गावपातळीवर नेऊन सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत असून, “शासन आपल्या दारी” ही संकल्पना या माध्यमातून प्रत्यक्षात उतरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *