बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार!  कै. नानासो. अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गौरव
1 min read

बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार! कै. नानासो. अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गौरव

Loading

बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार!

कै. नानासो. अरुण पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गौरव

अमळनेर प्रतिनिधी:
कै. नानासो. अरुण रामभाऊ पाटील यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र श्री. संदीप अरुण पाटील (निंभोरा) यांच्या वतीने मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता 10 वीच्या बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. भाग्यश्री प्रविण पारधी हिला ₹701, द्वितीय क्रमांकासाठी कु. गायत्री मनिलाल सैंदाणे हिला ₹501, आणि तृतीय क्रमांकासाठी चि. रोहित भगवान पारधी याला ₹301 अशी रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

या गौरव समारंभाला श्री. संदीप अरुण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनिल पाटील, तसेच माध्यमिक विद्यालय निंभोरा चे मुख्याध्यापक एन. आर. चौधरी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रेरणादायी उपक्रमाबद्दल शाळेचे मनःपूर्वक आभार-
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमासाठी श्री. संदीप अरुण पाटील यांचे शाळेच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *