सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
1 min read

सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

Loading

सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

अमळनेर वार्ताहर -अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यातील उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून माजी मुख्याध्यापिका गायत्री भदाणे ह्या होत्या तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य पी एम कोळी हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील उपस्थित होते. सुरुवातीला अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे आयोजित महापुरुषांचा जीवनपट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमांतर्गत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या माजी मुख्याध्यापिका गायत्री भदाणे यांचा मुख्याध्यापक पी एम कोळी यांनी स्वागत केले. आचल पाटील, निकिता पाटील, प्रतीक्षा पाटील, देवयानी पाटील, प्रणव पाटील, रितिका पाटील,हर्षाली पाटील यांनी भाषण केलीत. त्यानंतर प्रमुख वक्ते गायत्री भदाणे यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण जीवन प्रवास सांगितला. अध्यक्षीय भाषणातून बोलताना पी. एम. कोळी यांनी महापुरुषांच्या जीवनाचा संघर्ष व त्यांनी केलेले
समाजाविषयीचे कार्य याविषयी सांगितले. सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी नेहा पाटील व पल्लवी मोरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन हर्शना पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *