नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे*  *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद*
1 min read

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद*

Loading

*नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे*

*मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद*

*शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर अभिप्राय व शिफारशी पाठवा – अनिल बोरनारे यांचे शिक्षकांना आवाहन*

मुंबई (प्रतिनिधी) देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा शिक्षणातून होत असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताचे भविष्य आहे याच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर इयत्ता तिसरी ते दहावी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा 2025 जाहीर झाला असून यावर मुंबईतील शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक यांनी अभिप्राय व शिफारशी पाठवाव्या असे आवाहन मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केले

महामुंबई शिक्षण संस्था संघटनेची सर्वसाधारण सभा विक्रोळी येथील विकास हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मुंबईतील संस्थाचालकांसमवेत अनिल बोरनारे यांनी संवाद साधून या मसुद्यावर शिफारशी व सूचना पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे कार्यवाह डॉ विनय राऊत सहकार्यवाह राजेंद्र बोराडे सल्लागार गिरीश सामंत अशोक बेलसरे यांच्यासह मुंबईतील अनेक शिक्षण संस्थांचे संस्थाचालक उपस्थित होते.
सदर अभ्यासक्रम मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांचा आधार घेऊन तयार करण्यात आला आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2023 नुसार सांगितलेली अभ्यासक्रमाची ध्येय व अध्ययन क्षमतांचा महाराष्ट्राच्या संदर्भात बदल करून स्वीकार करण्यात आलेला आहे
या अभ्यासक्रमात मराठी इंग्रजी गणित कलाशिक्षण कार्य शिक्षण व्यावसायिक शिक्षण शारीरिक शिक्षण व निरामयता आपल्या सभोवतालांचे जग-१ विज्ञान आपल्या सभोवतालचे जग- २ इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र समाजातील व्यक्ती पर्यावरण शिक्षण संरक्षण शास्त्र वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण समाजसेवा या विषयांचा समावेश करण्यात आला असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी हा संपूर्ण मसुदा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षकांनी हा मसुदा वाचून आपले अभिप्राय शिफारशी व सूचना द्याव्यात असे आवाहन अनिल बोरनारे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *