न्यू इंग्लिश स्कूल डांगरीत विज्ञानाचा उत्सव – प्रयोग, जिज्ञासा आणि ज्ञानाचा संगम!
![]()
न्यू इंग्लिश स्कूल डांगरीत विज्ञानाचा उत्सव – प्रयोग, जिज्ञासा आणि ज्ञानाचा संगम!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ग्राम विकास मंडळ मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्रं.डांगरी ता.अमळनेर येथे मिल के चलो असोसिएशन व मारवड विकास मंच मारवड यांच्या सौजन्याने ङाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फिरती प्रयोगशाळेची भेट. सदर भेटीत विविध प्रयोगांची माहिती अतुल सैंदाणे सर यानी विद्यार्थ्यांना आनंददाई पध्दतीने विज्ञान प्रयोगांबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील विज्ञान विषयाची भिती त्यांनी आणलेल्या विज्ञान साहित्यांचे प्रयोग दाखवून दूर केली. त्यास इयत्ता दहावी व नववी चे विद्यार्थी भावेश मोरे,वेदिका शिसोदे, आलिया पठाण,वैभव कोळी आदींनी चांगला प्रतिसाद दिला .सदर कार्यक्रम चे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक राकेश पवार सर यानी भूषविले तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील सर यानी केले.आभार प्रदर्शन निलेश शर्मा सर यानी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे जेष्ठ शिक्षक पी.व्ही. साळुंखे,,जे.एन.करंदीकर, एस.बी. वाडीले सर,पी.के.सोनवणे मॅडम, आर.बी. शिंदे आदींनी सहकार्य केले

