कारगिलच्या रणसंग्रामातील शूरवीरांना श्रद्धांजली; अमळनेरात धनदाई आयटीआयत प्रेरणादायी कार्यक्रम”
1 min read

कारगिलच्या रणसंग्रामातील शूरवीरांना श्रद्धांजली; अमळनेरात धनदाई आयटीआयत प्रेरणादायी कार्यक्रम”

Loading

 

कारगिलच्या रणसंग्रामातील शूरवीरांना श्रद्धांजली; अमळनेरात धनदाई आयटीआयत प्रेरणादायी कार्यक्रम”

अमळनेर प्रतिनिधी: येथील धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित आयटीआय कॉलेजमध्ये २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष, धनदाई संस्थेच्या संचालिका , सौ. प्रमिलाताई दत्तात्रय पाटील होत्या.मंचावर शहीद जवान संतोष पाटील यांच्या धर्मपत्नी विरनारी वर्षा संतोष पाटील, शहीद जवान नरेंद्र कदम यांच्या धर्मपत्नी विरनारी कविता कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच धनदाई संस्थेच्या संचालिका ताईसो. प्रा.सौ. नयना पाटील, सचिव दादासो राधेश्याम पाटील, संचालक बापूसो नंदकुमार पाटील, ताईसो सौ. निशा पाटील आदी प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विरनारी वर्षा पाटील, कविता कदम यांना साडी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आजी माजी सैनिक फाउंडेशन चे उपाध्यक्ष माजी सैनिक भूषण विश्वास पाटील(ढेकू),खानदेश रक्षक फाउंडेशन संस्था अमळनेरचे माजी सैनिक विजय सूर्यवंशी (B.S.F) ,आर्मी हेअर डिफेन्स माजी सैनिक नितीन देवरे, माजी सैनिक ईश्वर चौधरी, आजी माजी सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक राजेंद्र यादव (मेजर अण्णा) या प्रमुख वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमासाठी धनदाई आय टी आय चे प्राचार्य, शिक्षक वृंद व आयटीआय चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन पाटील सर, निर्देशक भूषण पाटील सर, भूषण पवार सर, महेंद्र भामरे सर, नितीन सातपुते यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र महाजन सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *