“रुद्रच्या वाढदिवसाला विशेष विद्यार्थ्यांना प्रेमाचा मिठास – उपक्रमातून माणुसकीचं दर्शन” (शाळेसाठी सोलर प्लांट देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा)
![]()
“रुद्रच्या वाढदिवसाला विशेष विद्यार्थ्यांना प्रेमाचा मिठास – उपक्रमातून माणुसकीचं दर्शन”
(शाळेसाठी सोलर प्लांट देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा)
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी उपक्रमाने शनिवारचा दिवस खास ठरला. चि. रुद्र आकाश पवार याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील श्री. आकाश महेंद्र पवार (फर्निचर मॅन्युफॅक्चर, अमळनेर/पारोळा) यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रोख ₹५१००/- चे मीष्ठान्न भोजन व शैक्षणिक साहित्य (नोटबुक, पेन्सिल आदी) भेट दिले.
या कार्यक्रमाच्या वेळी श्री. महेंद्र पवार (संचालक – कुसुमाई फर्निचर इलेक्ट्रिक मॉल), श्री. पराग वाडे, श्री. तुषार पवार, श्रीमती अंजली पवार, भारती पवार व सोनल पवार हे मान्यवर उपस्थित होते.
विशेषतः, मा. श्री. महेंद्र पवार यांनी आपल्या मातोश्री व वडिलांच्या नावाने संस्थेच्या शाळा व वसतिगृहासाठी सौरऊर्जा प्रकल्प (सोलर प्लांट) उभारून देण्याची घोषणा करून उपस्थितांना भारावून टाकले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. अण्णासो. डॉ. योगेश महाजन सर यांच्या वतीने मनिष जाधव व रामकृष्ण शेलकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले.


