“क्रांती, विचार आणि साहित्याचा संगम – द्रौपदीबाई कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक स्मृतीदिन”
![]()
“क्रांती, विचार आणि साहित्याचा संगम – द्रौपदीबाई कन्या शाळेत अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक स्मृतीदिन”
अमळनेर प्रतिनिधी
श्रीमती द्रौपदी बाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी मॅडम व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे नूतन मराठा संस्थेचे पष्टाने येथील माध्यमिक शिक्षक असलेले श्री. दयाराम पाटील सर वक्ते म्हणून लाभले.व त्यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन करून अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक श्री साखरलाल माळी सर व श्री कैलास बाविस्कर सर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संजीवनी देवरे यांनी केले व सरते शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती योगेश्री पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी व शिक्षकेतर बंधूंनी मोलाचे सहकार्य केले.

