“राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!”
1 min read

“राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!”

Loading

राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!”

नांदेड (प्रतिनिधी) –
दि. 31 जुलै 2025 रोजी फरांदे पार्क, नांदेड येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सभागृहात एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना ‘भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ तसेच ‘कृषी उद्योजक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या विशेष सन्मानाचे आयोजन ए.डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि पहाड फाउंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण ब्रह्माकुमारिज राजयोगिनी आदरणीय बी.के. अनिता दिदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्था संचालक, भाई-बहिणी व मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र शंकरपुरे यांनी आपल्या भाषणात देशी व सुधारित बियाण्यांचे 100 हून अधिक वाणांवर संशोधन सुरू असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी नैसर्गिक व जैविक शेतीचा अवलंब करून विषमुक्त उत्पादन घ्यावे, म्हणजेच “सुदृढ भारत” घडवता येईल, असे ते म्हणाले.
या गौरवाने नांदेड जिल्ह्यासह राज्यातील कृषी क्षेत्रात प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *