“टिळक-अण्णाभाऊंच्या विचारांचा स्फूर्तीदायक संगम ब्राम्हणवेलमध्ये!”
1 min read

“टिळक-अण्णाभाऊंच्या विचारांचा स्फूर्तीदायक संगम ब्राम्हणवेलमध्ये!”

Loading

*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे स्वातंत्र्य सूर्य लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरा !*

धुळे प्रतिनिधी

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे स्वातंत्र्य सूर्य लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली. कार्यक्रमात संस्थेचे सचिव मा.आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन. यांनी धुरा सांभाळली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. माळी बी. एन., कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. गणित शिक्षक श्री. रविंद्र सुर्यवंशी, कंत्राटी शिक्षक श्री. प्रमोद महाजन,लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध भाषणे, देशभक्तीपर व पोवाडा गीत गायन, नृत्य सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ महाजन यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून खाऊ वाटप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *