साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रेरणेचा* *स्त्रोत -* *प्रा.डॉ.राहुल निकम* *समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे जयंती* *उत्साहात संपन्न.*
![]()
*साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रेरणेचा* *स्त्रोत -* *प्रा.डॉ.राहुल निकम*
*समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे अण्णाभाऊ साठे जयंती* *उत्साहात संपन्न.*
लोकशाहीर, साहित्यसम्राट, लोकनाट्याचे जनक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे एक जागतिक आश्चर्य आहे. निव्वळ दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने आपल्या निरीक्षण शक्तीच्या, श्रवणशक्तीच्या, सुजनशीलतेच्या बळावर सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःखाचे, जीवन पद्धतीचे केलेले वर्णन हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अवघ्या 49 वर्षाच्या जीवन कार्यात अण्णाभाऊंनी निर्माण केलेल्या 90 पेक्षा अधिक साहित्यकृती समस्त भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर पोहोचविण्यास कारणीभूत ठरल्या. अण्णाभाऊंच्या साहित्यात सर्वसामान्य माणसाच्या छातीत धग आणि मनगटात रग निर्माण करण्याची ताकद असून ते समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे बोलताना समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक प्रा. अशोक पवार यांच्या महापुरुषांच्या विचारांच्या जागर या अभियानाखाली करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील विभाग प्रमुख तथा विद्यापीठस्तरीय समाजकार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.जगदीश सोनवणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाच्या प्रा.डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वावर देखील प्रकाशझोत टाकत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यामिनी माळी आणि राजेंद्र चौधरी या विद्यार्थ्यांनी देखील या महापुरुषाच्या संदर्भात आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शनपर सहकार्य मिळाले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. अनिता खेडकर, क्रीडा संचालक प्रा.डॉ. अनिता वैद्य, ज्येष्ठ प्राध्यापक विजयकुमार वाघमारे, प्रा. धनराज ढगे, प्रा.डॉ. भरत खंडागळे, प्रा.डॉ. सागरराज चव्हाण यांच्यासह अन्य प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.


