साहित्याने सामाजिक क्रांती घडवणारा लोकशाहीर – अण्णाभाऊ साठे! अरविंद सोनटक्के यांचे प्रतिपादन
![]()
साहित्याने सामाजिक क्रांती घडवणारा लोकशाहीर – अण्णाभाऊ साठे!
अरविंद सोनटक्के यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी –
युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, माजी शिक्षण विस्ताराधिकारी अशोक बि-हाडे, डॉ. राहुल निकम, बापूराव ठाकरे व गौतम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी साठे यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील संघर्षाची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी “शिक्षण हे परिवर्तनाचे शस्त्र आहे” या तत्त्वावर भाष्य करताना सांगितले, की –
“अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर श्रमिक, वंचित, शोषित समाजाच्या व्यथा लेखणीद्वारे मांडणारे परिवर्तनाचे खरे शिल्पकार होते. त्यांचे साहित्य समाजजागृतीसाठी आणि स्वाभिमान जागवण्यासाठी झळाळते दीपस्तंभ ठरले आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून अण्णाभाऊंच्या साहित्यिक वाटचालीची ओळख करून दिली.
तत्पूर्वी, वक्ते अरविंद सोनटक्के यांचा सत्कार मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रतिनिधी ईश्वर महाजन यांनी केले, तर आभारप्रदर्शन एस.के. महाजन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील व गुरुदास पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाज परिवर्तनाचे प्रेरणास्थान असून, अशा कार्यक्रमातून नव्या पिढीला सामाजिक बांधिलकीची जाण व प्रेरणा मिळत आहे.

