म.सा.प. अमळनेर शाखेत नवे नेतृत्व : मनोहर नेरकर यांची निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती
1 min read

म.सा.प. अमळनेर शाखेत नवे नेतृत्व : मनोहर नेरकर यांची निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

Loading

म.सा.प. अमळनेर शाखेत नवे नेतृत्व : मनोहर नेरकर यांची निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून कार्यकारणीच्या निमंत्रित सदस्य पदी श्री मनोहर नेरकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. म.सा.प चे नूतन अध्यक्ष श्री संदीप घोरपडे यांनी एका पत्रांन्वये ही घोषणा केली,श्री मनोहर नेरकर हे सध्या धरणगाव येथे केंद्रप्रमुख असून ते उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत यापूर्वी त्यांनी अमळनेर येथे कवी संमेलन,कवी कट्टा याचे आयोजन केले आहे
येत्या वर्षभरात मसाप तर्फे गावागावात उपक्रम घेऊन महाराष्ट्रातील संतांच्या कार्याचा जागर करणे स्थानिक लेखकांच्या पुस्तकांवर चर्चासत्र घडवून आणणे तसेच राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटकाची निवड करून स्पर्धेत नाटक दाखल करण्याबाबत चर्चा करून म.सा.प.ला प्रस्ताव पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली . श्री नेरकर यांच्या या निवडीचे अध्यक्ष संदीप घोरपडे, कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक,कोषाध्यक्ष उमेश काटे, उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख कार्यवाह विजया गायकवाड, सदस्य नरेंद्र निकुंभ, डॉ.रमेश माने,दिलीप सोनवणे ,निरंजन पेंढारे ,गोकुळ बागुल, शरद पाटील, प्रा.डॉक्टर ज्ञानेश्वर मराठे,प्रा. बी एन चौधरी, भारतीय सोनवणे सुनीता पाटील मराठी वाङ्ममय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, रणजीत शिंदे, प्रा. श्याम पवार आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *