कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” एक पेड मॉ के नाम ” उपक्रम यशस्वी*
1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” एक पेड मॉ के नाम ” उपक्रम यशस्वी*

Loading

*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे ” एक पेड मॉ के नाम ” उपक्रम यशस्वी*

आज दि. ३१/०७/२०२५ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे पंचायत समिती साक्री शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. दिलीप ठाकरे साहेबांनी धावती भेट दिली. यादरम्यान शाळेतील प्रार्थना परिपाठ पाहून साहेब खुश झाले. काही सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थी विद्यार्थिनींचे समाधानकारक उत्तरे ऐकून कौतुक केले. व परिपाठात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना रोख बक्षीस दिले. सोबतच विद्यालयाच्या प्रांगणात साहेबांनी स्वतः वृक्षारोपण केले. व शासन पातळीवरून निर्गमित उत्कृष्ट उपक्रम ” एक पेड मॉ के नाम ” या संकल्पनेनुसार विद्यार्थी विद्यार्थिनी व माता पालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ महाजन, मुख्याध्यापक मा. माळी बी. एन. जेष्ठ शिक्षक श्री. माळी के. एन., श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी. एस., श्री. रविंद्र सुर्यवंशी, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे, व बहुसंख्य विद्यार्थी आणि माता पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *