लोकप्रतिनिधींच्या सन्मानभावनेचा अनोखा क्षण! प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवारातर्फे आ. बोंढारकर तिडके पाटील यांचा वाढदिवस साजरा; समाजरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीचा गौरव
![]()
लोकप्रतिनिधींच्या सन्मानभावनेचा अनोखा क्षण!
प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवारातर्फे आ. बोंढारकर तिडके पाटील यांचा वाढदिवस साजरा; समाजरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीचा गौरव
नांदेड प्रतिनिधी –
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, वसंत नगर नांदेड येथे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय व सर्वसामान्यांशी जोडलेले आदरणीय आमदार बोंढारकर तिडके पाटील यांचा वाढदिवस ब्रह्माकुमारी परिवारातर्फे अत्यंत उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार बोंढारकर साहेबांच्या हस्ते राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे फरांदे पार्क नांदेड यांचा सन्मान करण्यात आला. या गौरवसमारंभात वरिष्ठ ब्रह्माकुमारी स्वाती दिदी, अनिता दिदी, सत्या दिदी, मिना दिदी, तसेच अनेक वरिष्ठ भाई आणि ब्राह्मण परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम अतिशय सकारात्मक, सौम्य आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित सर्वांनी आमदार साहेबांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या लोकसेवेच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

