व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा “पदग्रहण सोहळा”उत्साहात संपन्न*
![]()
*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा “पदग्रहण सोहळा”उत्साहात संपन्न*
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा “पदग्रहण सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री दत्तात्रय निकम पोलीस इन्स्पेक्टर अंमळनेर पोलीस स्टेशन , मा.श्री तात्यासाहेब सुरेश विक्रम पाटील सरपंच एकरुखी उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर तसेच प्रोफेसर मा. सौ. मंदाकिनी भामरे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली.
त्यानंतर शाळेच्या विद्यार्थी परिषदेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला आणि त्यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेतील पदग्रहण समारंभ हा एक औपचारिक कार्यक्रम असतो जिथे विद्यार्थ्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत नियुक्त केले जाते आणि त्यांना त्यांच्या अधिकाराचे बॅज दिले जातात.
यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस इन्स्पेक्टर मा. श्री दत्तात्रय निकम सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी परिषदेतील सदस्यांनी शाळेतील शिस्त आणि नियम पाळण्याची जबाबदारी घ्यावी तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्शवत उदाहरण असावे. त्यांनी शाळेच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम करावे. त्यानंतर शाळेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना पद आणि जबाबदाऱ्याची शपथ देण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रोफेसर सौ. मंदाकिनी भामरे मॅडम यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना शाळेच्या विकासासाठी आणि शिस्त राखण्यासाठी उत्तम कार्य करण्याची प्रेरणा दिल. या सोहळ्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींना त्यांच्या नवीन जबाबदाऱ्यांची जाणीव झाली शाळेसाठी योगदान देण्याचा निर्धार केला.
या उत्साहपूर्ण प्रसंगाचे अवचित्य साधून कार्यक्रमात यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांनी Indian Talent Olympiad या परीक्षेत प्राप्त केलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि सुवर्णपदके देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या संचालिका सौ. अलका पवार,शाळेच्या प्राचार्या वर्षा सोहिते उपाध्यक्ष मा. श्री.उमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी खाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता पाटील व प्रतिक्षा पाटील यांनी केले तर स्वागत गीत नीतू शेलकर,रोशनी महाजन,प्रतीक्षा पाटील यांनी सादर केले. शिक्षिका योगिता फाळके, मनीषा सोनार, श्वेता सोनकुसरे,मनीषा ठाकूर संगीता पाटील,मयुरी पाटील, प्रियंका पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील व संगीता चौधरी यांचे कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य लाभले.



