विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न – जळोद ते अमळनेरचा भक्तीमय प्रवास
![]()
विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य पायी कावळ यात्रा उत्साहात संपन्न – जळोद ते अमळनेरचा भक्तीमय प्रवास
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दिनांक २७ जुलै २०२५ रोजी, रविवारच्या दिवशी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर, अमळनेर या मार्गावर भक्तीभावाने आणि उत्साहात पायी कावळ यात्रा पार पडली. या यात्रेमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, श्रद्धेचे अनोखे दर्शन घडविले.
यात्रेची सुरुवात जळोद येथे झाली, जिथे अनिल साळूंखे व भैय्या साळूंखे यांच्या पुढाकाराने भोजन व्यवस्था करण्यात आली होती. यात्रे दरम्यान जयंत पाटील, योगेश वाल्हे, पत्रकार विकी जाधव यांनी नाश्ता व चहा पुरवून यात्रेकरूंची सेवा केली.
या पायी यात्रेत रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये संजय पाटील, अशोक साळूंखे, अमोल पाटील, सुनील शिगांणे, प्रवीण गुजर, रोहित तेले, कल्पेश साळूंखे, नरेंद्र गुजर, मिलिंद वारुळे, विवेक पाटील, सनी पाटील, सचिन सोनवणे, मोहित पवार, भागीरथ पाटील, अनिल शिगांणे, चेतन पाटील, यश अहिरे, प्रवीण वाघ, सुभाष चव्हाण, विलास सोनवणे, दीपक गुजर, सिद्धार्थ पाटील यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे या कावळ यात्रेत महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक एकोपा व धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडवले. यात्रेचा समारोप विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात आरती, प्रसाद व हरिनाम संकीर्तन यांसह भक्तिपूर्ण वातावरणात झाला.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत व भक्तांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद ठरला. अशी भक्तिपूर्ण यात्रा ही भाविकांना अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारी ठरते.


