बंधुत्वाच्या उत्सवात अध्यात्माचा सन्मान — ब्रह्माकुमारी दीदींच्या हस्ते मान्यवरांचा गौरव
1 min read

बंधुत्वाच्या उत्सवात अध्यात्माचा सन्मान — ब्रह्माकुमारी दीदींच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

Loading

बंधुत्वाच्या उत्सवात अध्यात्माचा सन्मान — ब्रह्माकुमारी दीदींच्या हस्ते मान्यवरांचा गौरव

 

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त कळमसरे गावात ब्रह्माकुमारी विद्या दीदी (संचालिका, ब्रह्माकुमारी सेवा केंद्र, अमळनेर) यांचे आगमन झाले. या प्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात पोलिस पाटील श्री. गोपाल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक श्री. भरत पाटील, भैय्यासाहेब पाटील (चेअरमन, वि.का. सोसायटी, कळमसरे), डॉ. कपिल महाजन, रामदेव बडगुजर सर, आधार सोनवणे (कोतवाल) यांचा सन्मान ब्रह्माकुमारी विद्या दीदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. प्राचार्य व्ही. आर. पाटील सर (राणी लक्ष्मीबाई कॉलेज, पारोळा), सौ. किरणताई, बी.के. धनंजय भाई, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व ब्रह्माकुमारी परंपरेतील भाई-बहिणींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमात दीदींनी रक्षाबंधनाचे अध्यात्मिक महत्त्व विशद करताना ‘आपल्या जीवनात शांती, सद्भाव आणि आत्मिक नाते टिकवण्यासाठी रक्षाबंधन हे एक श्रेष्ठ माध्यम आहे,’ असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत आनंददायी, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *