अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
1 min read

अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Loading

अहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी सकल धनगर समाज आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)–
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अवमानप्रकरणी संतप्त भावना व्यक्त करत सकल धनगर समाजाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी मा. नितीनकुमार मुंडावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष सध्या देशभर विविध उपक्रमांद्वारे साजरे करण्यात येत असून, केंद्र व राज्य शासन या महत्त्वाच्या कार्यात सक्रीय सहभागी आहे. राजमाता अहिल्यादेवी या केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासात कुशल प्रशासक, न्यायप्रिय शासक आणि लोककल्याणकारी म्हणून अढळ स्थान लाभलेल्या आदर्श व्यक्तीमत्व आहेत.
मात्र, अशा महनीय विभूतीविषयी फेसबुकवर सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीने, मोबाईल नंबर ८९७५५७९०५० वरून, अत्यंत घृणास्पद व अश्लील भाषेत अपमानास्पद पोस्ट केल्यामुळे समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
सकल धनगर समाजाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “हा प्रकार समाजात द्वेष पसरवणारा असून, कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. अशा प्रवृत्तींवर जर वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर जनक्षोभ वाढून सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
या निवेदनावर बन्सीलाल भागवत (उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश मौर्य क्रांती संघ), एस.सी. तेले सर (ता. अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल), संदीप घोरपडे (अध्यक्ष – म.सा.प. अमळनेर), प्रा. अशोक पवार (अध्यक्ष – युवा कल्याण प्रतिष्ठान), प्रा. सुभाष जिभाऊ पाटील (संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती), रियाज शेख (सामाजिक कार्यकर्ते), आबासाहेब हरचंद लांडगे (माजी शहराध्यक्ष भाजप), गोपीचंद शिरसाट (ता. अध्यक्ष – मौर्य क्रांती संघ), प्रदीप कंखरे (संचालक – प्रदीप अँग्रो), रमेशदेव शिरसाट (अध्यक्ष – हमाल मापाडी संघ), दिलीप ठाकरे, मनोहर मोरे, अनिल धनगर, विकास सूर्यवंशी, सौरव भागवत, दिलीप खांडेकर, प्रा. आर.पी. धनगर, कैलास ठाकरे, जितेंद्र भालेराव, दिनेश धनगर, नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे, परशुराम ठाकरे आदींच्या सह्या आहेत.
प्रशासनाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी सकल धनगर समाजाची ठाम मागणी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *