वृद्धाश्रमात हिंदूंचेच आईवडील का?” — रोहित माऊलींचा ज्वलंत सवाल
![]()
“वृद्धाश्रमात हिंदूंचेच आईवडील का?” — रोहित माऊलींचा ज्वलंत सवाल
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ढवळ ता.फलटण येथील कीर्तनात हिंदू धर्माच्या मूल्यांवर थेट प्रहार करणारा आणि अंतर्मनाला हादरवणारा मुद्दा मांडण्यात आला.
हिंदू धर्म प्रवक्ता रोहित महाराज (रोहित माऊली), डोंगरगाव, जि. धुळे यांनी उपस्थित भाविकांसमोर विचारले –
“हिंदू धर्माचेच आईवडील वृद्धाश्रमात का दिसतात? इतर धर्मातील दिसत नाहीत का? ही एक योगायोगाची गोष्ट नसून, संस्कारांची घसरण आहे.”
माऊली पुढे म्हणाले –
“पूर्वी लोकांकडे पैसे नव्हते, तेव्हा फाटलेले कपडे शिवून वापरायचे, कारण त्यांना सन्मान आणि नीटनेटकेपणाचं भान होतं.
पण आज लोकांकडे पैसा असूनही मुद्दाम फाटलेले कपडे ‘फॅशन’ म्हणून घालतात.
ही परिस्थिती म्हणजे आपल्या समाजाची शोकांतिका नाही का?”
या वेळी त्यांनी उपस्थित तरुणांना विचारले –
“तुम्हाला गीता, रामायण, संतविचार माहिती आहेत का?”
पण कोणीही उत्तर देऊ शकलं नाही.
तेव्हा माऊली म्हणाले –
“मग पिक्चरचं गाणं वाजवू — पाहू कोण म्हणतं?”
गाणं लागताच मागच्या रांगेतली मुलं लगेच म्हणायला लागली.
“हीच शोकांतिका आहे — संतांचे अभंग आठवत नाहीत, पण चित्रपटाची गाणी तोंडपाठ आहेत!”
माऊली म्हणाले –
“आजची तरुण पिढी संतांचे आचरण करत नाही, सेलिब्रिटींचं आंधळं अनुकरण करत आहे.
काय बोलावं, काय घालावं यावरचं भान हरवलं आहे. सेलिब्रिटींच्या कपड्यांची नक्कल, वागणुकीची कॉपी – हेच आज ‘संस्कार’ मानलं जात आहे.”
“सेलिब्रिटींनी स्वतःचं आचरण शुद्ध केलं पाहिजे, कारण समाज त्यांना पाहतो, अनुकरण करतो.
जर त्यांनी सन्मार्ग सोडला, तर एकेकाळचा संस्कृतीवंत समाज विकृतीकडे वळणार, हे निश्चित आहे,”
असा स्पष्ट इशारा रोहित माऊलींनी दिला.
या विचारांनी कीर्तनात उपस्थित सर्वजण अंतर्मुख झाले. समाजाने आपली मूल्यं, आपली माती, आणि आपल्या संतांच्या शिकवणीकडे पुन्हा वळावं — असा संदेश यामधून पोहोचला.

