भुसावळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन सभा व प्रशिक्षण संपन्न*
![]()
*भुसावळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन सभा व प्रशिक्षण संपन्न*
» भुसावळ । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन सभा व प्रशिक्षण सेंट अलॉयसेस स्कूल भुसावळ येथे उत्साह पूर्ण वातावरणात गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सीला सिमोंस , भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ प्रदीप साखरे, दे.ना. भोळे महाविद्यालय भुसावळ चे क्रीडा संचालक संजय चौधरी,तालुकाध्यक्ष डी. आर.धांडे, ईब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक आर. आर. धनगर , अपर्णा राजपूत, नगरपालिका शिक्षण मंडळ होते निलेश लखोटेआदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त शाळांनीआपले विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करावे. व आपल्या भुसावळ तालुक्याचे नाव जिल्हा, राज्यपातळीवरती कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील क्रीडा शिक्षक हे क्रीडा स्पर्धांसाठी पाठवावे जेणेकरून शासकीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतील. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले तर त्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास हा झपाट्याने होत असतो. असे आवर्जून सांगितले. क्रीडा स्पर्धा या निपक्षपातीपणामध्ये घेतल्या जाव्यात, येणाऱ्या अडीअडचणी वरती मात करण्याकरिता माझी मदत लागल्यास माझ्याकडून केली जाईल, व या क्रीडा स्पर्धा अतिशय चांगल्या रित्या घेतल्या जाव्या असे आवाहान त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना व शाळांना खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तदनंतर
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नियोजन बाबत चर्चा करण्यात आली, क्रीडा स्पर्धेसाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली, खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी करण्यासंबंधीचे प्रशिक्षण मेघश्याम शिंदे , एस.टी. चौधरी यांनी दिले. तालुकास्तरीय दहा क्रीडा प्रकारांचे आयोजन व नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व सर्व क्रीडा शिक्षक तसेच सेंटअलॉयसेस हायस्कूलचे एलिस्टर सिमोंस व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

