सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघ संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
![]()
सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघ संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
असोदा :- सार्वजनिक विद्यालयात दहावीत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक संघ व सर्वोदय एज्युकेशन सोसायटी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थाध्यक्ष अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, अरुण बोरोले, (उद्योजक ) डॉ. मिलिंद पाटील, घनश्याम चौधरी,संस्थेचे संचालक गोपाळ भोळे,रत्नाकर महाजन,दिलीप अत्तरदे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर चौधरी, सहसचिव भारती पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल पर्यवेक्षक लालसिंग पाटील सर्व मान्यवर उपस्थित होते.सरस्वती व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी दहावीत प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी तृप्ती बिऱ्हाडे,हेमांगी पाटील, प्रज्ञा कापडणे, हरिता नारखेडे,देवयानी माळी व त्यांचे माता पालक सर्वोदय एज्युकेशन सोसायटी,पालक शिक्षक संघ संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून स्टडी टेबल हे एक प्रतिकात्मक बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या पाचवीच्या विद्यार्थिनी श्रुतिका सोनवणे, सिद्धी कोल्हे आठवीची विद्यार्थिनी चरणीका चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, वेळेचे महत्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले संस्थेविषयी व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुणे अरुण बोरोले यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी नुसत्या मार्कांचा विचार न करता बौद्धिक विकास घडवून आणला पाहिजे व अधिकाधिक वाचन करून विविध कौशल्यांचा विकास केला पाहिजे असे मत मांडले. दुसरे प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद पाटील यांनी शीघ्र कविता करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. घनश्याम चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी ,सोशल स्टडीज कडे विद्यार्थ्यांचा कल असला पाहिजे तसेच आपल्यातील सर्जनशीलतेला ओळखून यशस्वी व्हा आपल्या कलेला वाव द्या असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल पाहुण्यांचा परिचय सिंधू मोरे सूत्रसंचालन मीनाक्षी कोल्हे तर आभार स्वाती वाघुळदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

