शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात!
1 min read

शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात!

Loading

शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात!

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
शिवसेनेचे पदाधिकारी आणि अमळनेर शहरातील युवा नेतृत्व दीपक पाटील यांच्याबाबत काही दिवसांपासून विविध चर्चा रंगल्या होत्या. काहींनी दावा केला की, शुभांगीताई पाटील व दीपक पाटील यांच्यात मतभेद झाल्यामुळे दीपक पाटील राष्ट्रवादीत गेले आहेत. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत, शुभांगीताई पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझं महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष पद कायम आहे.”
त्याचबरोबर, दीपक पाटील यांनीही मराठी लाईव्ह शी बोलताना सांगितले की, “शुभांगीताईंशी माझे संबंध सुसंवादात्मक आहेत. त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. लवकरच त्या मला राज्यपातळीवर जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे.”
या वक्तव्यांमुळे सत्ताकारणातील चर्चांना ब्रेक लागला असून, युवा नेतृत्व व संघटनात्मक बांधणी याबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताई यांनी सांगितले की
दीपक पाटील यांच्या नेतृत्वामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक बळकट होणार आहे, असे संकेत मिळत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *